पिंपरी: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प वर्षात पूर्ण करा ; अभियानाचे संचालक राहुल कपूर यांच्या सूचना | Rahul Kapoor Director of the Smart City Complete All Years Campaign pune print news amy 95 | Loksatta

पिंपरी: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प वर्षात पूर्ण करा ; अभियानाचे संचालक राहुल कपूर यांच्या सूचना

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राहुल कपूर आणि प्रकल्प सल्लागार संपत कुमार शहरात आले होते.

पिंपरी: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प वर्षात पूर्ण करा ; अभियानाचे संचालक राहुल कपूर यांच्या सूचना
( संग्रहित छायचित्र )

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करावेत, अशा सूचना स्मार्ट सिटी अभियानाचे संचालक राहूल कपूर यांनी पिंपरी पालिकेला केल्या आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राहुल कपूर आणि प्रकल्प सल्लागार संपत कुमार शहरात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांची राहुल कपूर यांनी माहिती घेतली. प्रकल्प सल्लागारांनी सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, ई– क्लास रुम, ई- टॉयलेट, सिटी मोबाईल ॲप तसेच पाणीपुरवठा, पर्यावरण, वाहतूक, वाहनतळ, सुरक्षाविषयक आदी प्रकल्पांचे सादरीकरण केले. याशिवाय, पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यान व वाहनतळ व्यवस्था, रस्ते, पदपथ, ज्येष्ठ नागरिकांसाठीची खुली व्यायामशाळा, बैठक व्यवस्था, सुदर्शन चौकात सलग ७५ तासांत उभारण्यात आलेला “८ टू ८० पार्क” प्रकल्प, रस्ते व सायकल ट्रक अशा प्रकल्पांचे कपूर यांनी कौतुक केले. स्मार्ट सिटीचे प्रकल्प कसे उपयुक्त् आहेत, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या बैठकीत त्यांनी पिंपरी पालिकेला केल्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : कोंढव्यात साडेसात लाखांचे मेफेड्रोन जप्त

संबंधित बातम्या

पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन
शहरासह जिल्ह्य़ात निर्बंध ‘जैसे थे’
पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला विक्रमी संख्येने पर्यटकांची भेट
पुणे : सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून तीन लाखांचा ऐवज लांबविला
आगाऊ मुद्रांक शुल्क भरलेल्यांना दस्त नोंदणीसाठी केवळ सहा दिवस संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द