scorecardresearch

Premium

पिंपरी-चिंचवड : सामाजिक एकोपा जपण्यासाठी पोलिसाने गायले ‘विठू माऊली तू’..! हे गीत; सोशल मीडियावर व्हायरल

राहुल सुतार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, आषाढी वारीच्या निमित्ताने हे गायलेलं गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rahul Sutar sang Vithu Mauli Tu
पिंपरी-चिंचवड : सामाजिक एकोपा जपण्यासाठी पोलिसाने गायले 'विठू माऊली तू'..! हे गीत, सोशल मीडियावर व्हायरल (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सामाजिक एकोपा जपण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी राहुल हरिनाथराव सुतार यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गीत गायलं आहे. राहुल सुतार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, आषाढी वारीच्या निमित्ताने हे गायलेलं गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्षभरातून एकदा येणाऱ्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरला जातात. आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून सावळ्या विठ्ठलाला साकडं घालतात. आळंदी आणि देहूतून संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि जगद्गुरू संत तुकोबांची पालखी पंढरपूर येथे पोहोचलेली आहे. याच आषाढी वारीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील राहुल सुतार यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ गीत गायले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
Mahatma Gandhi Jayanti Bapu Educational Background Why He Was Criticized For Going London From Porbunder after marriage
महात्मा गांधी यांचे शिक्षण किती होते? पोरबंदर ते लंडन कसा झाला बापूंचा प्रवास..
Manmohan singh birthday
वित्तरंजन : धोरणकर्ते डॉ. मनमोहन सिंग
dombivli girl rape, live in relationship rape, live in relationship girl gangraped
डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर मित्रांचा सामुहिक लैंगिक अत्याचार

हेही वाचा – लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

राहुल हे गेल्या पंधरा वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कार्यरत आहेत. सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी पोलिसाचा गणवेश घालून (वर्दी) घालून हे गीत गायले आहे. राहुल यांना लहान असल्यापासूनच गायनाची विशेष आवड होती. परंतु, नोकरी पोलीस दलात असल्याने ते यापासून दुरावले, मात्र जेव्हा त्यांना वेळ मिळतो त्या वेळेत ते आपला गायनाचा छंद पूर्ण करतात. त्यांनी आषाढी वारी निमित्त ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणं गाऊन समाजात गुण्या गोविंदाने राहण्याचा संदेश दिल्याचं समाधान व्यक्त केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul sutar a policeman sang vithu mauli tu to maintain social harmony kjp 91 ssb

First published on: 29-06-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×