पुणे : शहरात नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कपडे, बॅग, बूट अशा साहित्याची विक्री करण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ‘प्यूमा ब्रँड’चे बनावट साहित्य विकणाऱ्या दुकानावर छापा या दुकानामधून ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे शहरात वेगवेळया ठिकाणी नामांकित कंपनीच्या बनावट मालाची विक्री होत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आणि पथकातील अधिकारी अशा प्रकारच्या बेकायदा विक्रीचा शोध घेत होते. त्यांनी प्यूमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत ही शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी कात्रज-आंबेगाव बुद्रुकमधील लिपाणे वस्ती येथील ‘स्टायलॉक्स फॅशन हब’ या दुकानामध्ये मोठया प्रमाणावर प्यूमा कंपनीची नाममुद्रा वापरुन बॅग, टी-शर्ट, स्पोटस शूज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्राऊजर, बॉक्सर पॅन्टची विक्री सुरू असल्याचे समोर आले. त्याची खातरजमा करून पोलिसांनी दुकानामध्ये छापा टाकला. पोलिसांनी ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट ॲक्ट १९५७ चे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात, नागनाथ राख यांच्या पथकाने केली आहे.

Story img Loader