scorecardresearch

बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा ;एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

बिबववेवाडीतील झांबरे वस्ती परिसरात बेकायदा गावठी दारू विक्री अड्डयावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

बिबववेवाडीतील झांबरे वस्ती परिसरात बेकायदा गावठी दारू विक्री अड्डयावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू जप्त केली. दारू विक्री प्रकरणात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अनिल यशवंत गुप्ते (वय २८) आणि विजय सीताराम कट्टीमणी (वय २४, दोघे रा. अण्णाभाऊ साठेनगर, झांबरे वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. दारू विक्री प्रकरणात शारदा किसन सोना‌वणे (वय ६०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीत अण्णाभाऊ साठेनगर परिसरात गावठी दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू आणि रोकड असा मुद्देमाल जप्त केला. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, बाबा करपे, राजश्री मोहिते, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raids village liquor outlets bibwewadi one thousand liters village liquor seized two arrested pune print news amy

ताज्या बातम्या