पुणे : रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रेल्वेला भविष्य़ात नवीन प्रकल्प राबविताना यामुळे अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेने आता अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरू केली आहे. शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या अतिक्रमणांवर रेल्वेने हातोडा मारला आहे.

शिवाजीनगर ते खडकी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी झोपड्या उभारल्या होत्या. रेल्वेने हे अतिक्रमण हटवण्यासाठी धडक कारवाई केली. या कारवाईत रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस दल आणि स्थानक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. रेल्वेचे ५० गँगमन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या ३० कर्मचाऱ्यांनी चार जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत रेल्वे प्रवासी वाऱ्यावर? पुणे स्थानक रोज दोन ते चार तास बंद राहण्याची शक्यता

पाच कोटींची जागा परत मिळवली

शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या सुमारे १५० ते २०० झोपड्या हटवण्यात आल्या. यातून रेल्वेने अतिक्रमण झालेली ५५०x२० मीटर जागा पुन्हा ताब्यात घेतली आहे. या जागेचे बाजारमूल्य सुमारे पाच कोटी रुपये आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी यापुढेही सातत्याने अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.