आणि चक्क पुण्यात रेल्वे इंजिन आलं रस्त्यावर

पुण्यात खडकीजवळ बोपोडीत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर रेल्वेचे इंजिन रस्त्यावर आल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

पुण्यात खडकीजवळ बोपोडीत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर रेल्वेचे इंजिन रस्त्यावर आल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक रस्त्यावर रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. रेल्वे इंजिन रस्त्यावर आले तेव्हा कोणताही कर्मचारी वाहतुक थांबविण्यासाठी हजर नव्हता. त्यामुळे रत्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

खडकी भागात दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे. सामनाची ने आण करण्यासाठी कारखान्यात जाण्यासाठी रेल्वे रूळ आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रूळ बंद होता. ज्यावेळी रेल्वे कारखान्यात जात असे तेव्हा संरक्षण दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी थांबून वाहतूक थांबवित असत.

गुरुवारी अचानक येथे रस्त्यावर रेल्वे आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने यात कोणताही अनुचित घटना घडली नाही.

दरम्यान, खडकी रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी अचानक इंजिन बोपोडीतील महामार्गावर आणलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway engine in pune comes on road in bopodi nck

ताज्या बातम्या