scorecardresearch

रेंजहिल्स भागातील अतिक्रमणांवर २६ एप्रिलला रेल्वेचा हातोडा; सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई

शिवाजीनगर ते खडकीदरम्यान रेंजहिल्स येथे मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात लोहमार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर २६ एप्रिलला कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : शिवाजीनगर ते खडकीदरम्यान रेंजहिल्स येथे मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात लोहमार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर २६ एप्रिलला कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

खडकी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गापासून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या लोहमार्गालगत रेंजहिल्स भागात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे झालेली आहेत. या भागात सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी ७ एप्रिललाच रेल्वेकडून नियोजन करण्यात आले होते. त्याबाबतच्या सूचनाही संबंधितांना दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमणे असलेल्या नागरिकांनी १६ एप्रिलपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. या कालावधीत स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्याची तयारीही दर्शविली होती, असे रेल्वेने सांगितले.   कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती. अतिक्रमणकर्त्यांनी दिलेल्या मुदतीत रेल्वेची जमीन मोकळी केली नाही. त्यामुळे २६ एप्रिलला अतिक्रमणे काढण्याची नोटिस दिली आहे. अद्याप येथील अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा २६ एप्रिलला होणाऱ्या कारवाईत रेल्वे आपली जागा ताब्यात घेईल, असे पुणे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway hammer encroachments rangehills area action supreme court guideline ysh

ताज्या बातम्या