रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग  योग्य समन्वयातून प्रवाशाला परत

कोणार्क एक्स्प्रेस पुण्यात पोहोचताच गार्डने बॅग रेल्वे कर्मचाऱ्यांकडे दिली.

रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग  योग्य समन्वयातून प्रवाशाला परत
महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली आणि निवृत्ती वेतनासंदर्भातील फाईल असलेली ही बॅग पत मिळाल्यामुळे प्रवाशाने रेल्वे प्रवाशाचे आभार व्यक्त केले.

पुणे : मुंबई-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधील प्रवासादरम्यान गाडीत विसरलेली पुण्यातचील प्रवाशाची बॅग रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य समन्वयातून प्रवासाला परत मिळाली. महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली आणि निवृत्ती वेतनासंदर्भातील फाईल असलेली ही बॅग पत मिळाल्यामुळे प्रवाशाने रेल्वे प्रवाशाचे आभार व्यक्त केले.मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधून पुण्यापर्यंत या प्रवाशाने प्रवास केला. पुणे स्थानकावर उतरल्यानंतर काही वेळेने आपली बॅक गाडीतच विसरली असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले. बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याने बॅग गाडीत राहिल्याचा धक्काच या प्रवासाला बसला. मात्र, प्रवाशाने योग्य निर्णय घेत तातडीने पुन्हा पुणे रेल्वे स्थानक गाठले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

त्यांनी स्थानक उपव्यवस्थापकांच्या कार्यालयात याबाबतची माहिती दिली. बॅग विसरलेली गाडी तोवर सोलापूर विभागामध्ये पोहोचली होती. स्थानक उपव्यवस्थापक अनिलकुमार तिवारी यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी याबाबत सोलापूर विभागाचे स्थानक उपव्यवस्थापक प्रदीपकुमार कुंडू यांच्याशी संपर्क साधला आणि प्रवाशाची बॅग शोधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कुंडू यांनीही तत्परता दाखविली. गाडी सोलापूर स्थानकात पोहोचताच संबंधित डब्यातून सहकाऱ्यांच्या मदतीने बॅक शोधून काढली. पुण्याकडे येत असलेल्या कोणार्क एक्स्प्रेसच्या गार्डकडे त्यांनी ही बॅग सोपविली. कोणार्क एक्स्प्रेस पुण्यात पोहोचताच गार्डने बॅग रेल्वे कर्मचाऱ्यांकडे दिली. तिवारी यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सी. जी. उमरानी यांच्या उपस्थितीत संबंधित प्रवाशाकडे बॅग सोपविली. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅगही अशाच समन्वयातून प्रवाशाला परत करण्यात आली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway officials returned bag to pune passenger forget in mumbai visakhapatnam express pune print news zws

Next Story
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी आज अंतिम मुदत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी