scorecardresearch

पुणे: मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील हातकणंगले स्थानकावर मंगळवारी (ता.१४) ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुणे: मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील हातकणंगले स्थानकावर मंगळवारी (ता.१४) ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>महापालिकेची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा – राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बदलणे आणि इतर तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी धावणाऱ्या मिरज-कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा, मिरज-कोल्हापूर-मिरज, सांगली-मिरज, कोल्हापूर-सांगली, मिरज-कोल्हापूर या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाडी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजपर्यंत धावेल. ती मिरजपासून पुढे जाणार नाही. याचबरोबर १५ मार्चला धावणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस मिरजहून पुण्याला सुटणार आहे, अशी माहिती रेल्वेने कळवली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 21:31 IST