दिवाळीत पावसाची शक्यता

मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे असून, विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा हलका गारवा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या रात्री हलका गारवा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या जवळ आहे. कोकण विभागात मुंबई परिसरात ते सरासरीपेक्षा १ अंशांने अधिक आहे.

मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे असून, विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी गोंदिया भागात किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा हलका गारवा आहे.देशाच्या दक्षिण भागात सध्या पाऊस होतो आहे. पुढील एक दिवसात बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत.

 याचा परिणाम राज्यावर काही प्रमाणात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात १ नोव्हेंबरपासून दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain fall in diwali chance of rain on diwali akp

ताज्या बातम्या