– घाट विभागांत मुसळधारांचा अंदाज

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गुरुवारी (२३ जून) पावसाने हजेरी लावली. पुणे शहरात अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती. पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.  पुढील चार ते पाच दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट माथ्यावरील काही भागांत मात्र मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मुळशी त्याचप्रमाणे मावळ जिल्ह्यांतील घाट विभागात काही भागांत दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (२२ जून) काही भागांत जोरदार पाऊस झाला. पुणे शहरात मध्यवर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून केवळ ढगाळ आकाशाची स्थिती होती. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला. दुपारी काही वेळ पावसाचा जोर वाढला. काही वेळातच पाऊस थांबला असला, तरी ढगाळ स्थिती कायम होती. त्यामुळे संध्याकाळी तापमानात घट होऊन गारवा जाणवू लागला होता.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज
Chance of light showers of rain in Palghar and Thane on Monday and Tuesday
पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता