राज्यात आजही पावसाची शक्यता ; मुंबईत मध्यम सरी

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे : पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे.

अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही. आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

गेल्या चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

पुढील २ दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारीही मुंबईतील बहुतांशी भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या.   रविवारी रात्री ८.३० वाजल्यानंतर नवी मुंबई, ठाणे, मुंबई, इत्यादी ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी सुरू झाल्या. वाढते प्रदूषण आणि त्यामुळे होणारा वातावरण बदल याचे गंभीर परिणाम गेल्या काही वर्षांत समोर येत आहेत. मुंबईसह कोकणातील वातावरणीय स्थिती गंभीर बनली असून यंदाचा मोसमी पाऊस बराच लांबला. त्यानंतर नोव्हेंबरचा पंधरवडा उलटला तरीही या भागात थंडीला सुरूवात झालेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain state moderate mumbai ysh

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा