मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. यावेळी मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच ३ मेपर्यंत भोंगे उतरले नाही, तर देशभरात मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर चौकात मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी आले.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
pune rural police, Saswad, Planting Opium, Onion Field, arrest, Kodit Village, crime news,
पुणे : सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड
mumbai shivsena corporator marathi news, one more uddhav thackeray corporator joins eknath shinde
मुंबई : ठाकरे गटाचे आणखी एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत

खालकर चौकातील मारुती मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण

मनसेचे पुण्यातील नेते अजय शिंदे यांनी कुमठेकर रोडवरील खालकर चौकात मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हनुमान चालिसा कार्यक्रमास येणार असल्याने अजय शिंदे यांनी जय्यत तयारी केली होती.

भगवी शाल आणि चांदीची गदा देऊन राज ठाकरेंचं स्वागत

सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे कार्यक्रम ठिकाणी हजर झाले. त्यांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर भगवी शाल आणि चांदीची गदा देऊन मनसैनिकांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले.

या कार्यक्रमास मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, नेते बाबू वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Raj Thackeray poster of Hanuman Chalisa

महत्वाचं म्हणजे पुण्यातील महाआरतीच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला होता.

मुंबईतील गुढीपाडव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर ठाण्यात उत्तरसभा घेत होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे मुंबई, ठाण्यानंतर आता राज ठाकरेंनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा : “तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. आज (१६ एप्रिल) संध्याकाळी ते पुण्यात पोहोचले. यानंतर त्यांनी खालकर चौक हनुमान मंदिरात महाआरती केली.