scorecardresearch

Premium

राज ठाकरे पुण्यात

आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पुण्यावर लक्ष्य केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.

Raj Thackeray Pune
राज ठाकरे पुण्यात (छायाचित्र – संग्रहित छायाचित्र)

पुणे : आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पुण्यावर लक्ष्य केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले जात असले तरी, काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

मनसेकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पुणे मतदारसंघावर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज यांचे चिरंजीव अमित यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून अमित ठाकरेही सातत्याने पदाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठका घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विभाग प्रमुख आणि उप विभाग प्रमुखांबरोबर चर्चा केली होती. राज ठाकरे यांनी त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत पोहोचा, कामे करा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार राज पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची चर्चा होती. मात्र राज ठाकरे पुण्यात आले असले तरी, ते पक्षाची कोणतीही अधिकृत बैठक घेणार नाहीत.

threat post against CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत धमकीची पोस्ट करणारा तरुण पुण्यातून ताब्यात
Dharashiv district Maratha reservation
धाराशिव : तिसर्‍या दिवशीही मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र; उमरग्यात बस पेटवली, कळंबमध्ये दगडफेक, टायर पेटवून चक्काजाम
Amit Shah Maharashtra tour postponed
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित; ‘या’ दिवशी येण्याची शक्यता
Jayant Patil criticism of the rulers saying that Maharashtra has become Bihar because of Yashwantrao Chavan thinking
यशवंतरावांच्या विचाराच्या महाराष्ट्राचा बिहार झालाय; राज्यकर्त्यांवर जयंत पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”

लग्नसमारंभासाठी ते पुण्यात आले असून पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray has come to pune today this tour of raj thackeray is said to be private pune print new apk 13 ssb

First published on: 28-11-2023 at 14:02 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×