Raj ThRaj Thackeray Pune Sabha Speech Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरेंनी आज पुण्यात घेतलेल्या सभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून चौफेर टोलेबाजी केली. या सभेमध्ये आता राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.