scorecardresearch

पुणे: आम्ही फक्त प्रश्न सोडवायला; राज ठाकरे यांची खंत

आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो. आम्हाला कोणी मते देत नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी बोलून दाखविली.

पुणे: आम्ही फक्त प्रश्न सोडवायला; राज ठाकरे यांची खंत
(राज ठाकरे)

आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो. आम्हाला कोणी मते देत नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी बोलून दाखविली.रॅपिडो बाईक टॅक्सीच्या विरोधात सोमवारी बंद पुकारलेल्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये रिक्षाचालकांनी त्यांच्या समस्या सांगून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करणारे निवेदन राज ठाकरे यांना देण्यात आले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी ही खंत बोलून दाखविली.

हेही वाचा >>>पुणे: समाजमाध्यमाचा वापर करुन वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा नगर रस्त्यावर छापा; दलाल अटकेत

रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे आमचे जगणे नको झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत. तुमचा शब्द कोणी सहसा टाळत नाही. आमचा प्रश्नदेखील मार्गी लावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केली. प्रतिनिधी मंडळाची बैठक संपताना ‘आम्ही फक्त प्रश्न सोडवायलाच असतो’, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी करताच हशा उसळला. मते देण्याच्या वेळी अनेक जण आमच्याकडे पाठ फिरवतात, असे राज ठाकरे यांनी बोलून दाखविले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:19 IST

संबंधित बातम्या