मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला. मात्र, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं सुचक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित व्याख्यानमालेत ‘नवीन काहीतरी’ या विषयावर ते बोलत होते. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिले, हिंद प्रांतावर मराठेशाहीने राज्य केलं. त्या महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली की वाईट वाटतं, अशी खतंही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा – ‘भाजपाच्या तिकिटावर लढणार का?’, अनिल परबांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

काय म्हणाले राज ठाकरे?

“आजचे राजकारण तुम्हाला माहिती आहे. राजकीय नेत्यांचं बोलणं, बघितलं तर ते बघूच नये असं वाटतं. यात काही टेलिव्हिजन चॅनलचाही वाटा असतो. त्यामुळे मुख्य विषय बाजुला राहतात आणि याला काय वाटतं, त्याला काय वाटतं, तेच दिवसभर सुरू राहतं. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, हिंद प्रांतावर मराठेशाहीने राज्य केलं, त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली की वाईट वाटतं”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

“… तर पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”

“कधी कधी माझ्या मनात ‘१९९५च्या आधीचा महाराष्ट्र नंतरचा महाराष्ट्र’ असा एक लेख लिहावा असं विचार येतो. आज तुम्ही मुंबईची अवस्था बघा, तसेच तुम्ही ज्या पुण्यात राहता, त्या पुण्याची अवस्था बघा, चार-चार पुणे शहरं वसली आहेत. त्यामुळे मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, मात्र, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – अनिल देशमुखांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “ईडीने १०९ वेळा त्यांच्या घरावर छापे टाकले, हा तर…”

“तुमचं आयुष्य राजकारणाला बांधलेलं”

“तुमचं संपूर्ण आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राजकारणाला बांधलेलं आहे. तुमच्या घरी येणारं दुध, पाणीपट्टी, वीज या सर्वांचे दर राजकीय नेते ठरवत असतात आणि ते तुम्ही निमूटपणे भरता. कोणालाही काही प्रश्न विचारत नाहीत. राजकारण गलिच्छ आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे अनेक तरूण मुलं, मुली परदेशात जातात. इथे राहातच नाहीत. तुमचं शांत आणि गप्प राहणं, तुमचं सहकार्य या राजकारणात नसणं यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर बरबाद होतो आहे हे आपण शांतपणे पाहतो आहोत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.