कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे.

हेही वाचा >>> पुणे : ससूनमधील ९० टक्के कर्मचारी संपात सहभागी; ‘मार्ड’ डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात आहे. नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे जलचर संकटात आले आहेत. तसेच पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत होत आहेत. प्रक्रिया न करता महापालिकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडले जाते. कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही आणि दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते असा आरोप याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी यांच्यासह प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व स्वतः शेतकरी सुद्धा याचिकाकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यासह अ‍ॅड. गौतम कुलकर्णी, अ‍ॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत.