पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने १६ ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा भरवली आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या स्पर्धेत खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स या संघाची मालकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.

आयपीएलप्रमाणे एमपीएलमध्येही खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात छत्रपती संभाजी किंग्जने २२ खेळाडू खरेदी केले असून त्यातले ११ खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत. या स्पर्धेत सर्वच संघांनी आपले आयकॉन खेळाडू नियुक्त केले असून, भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणारा तसेच रणजी खेळाडू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिवकर राजवर्धन हंगरगेकर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या सीएसकेकडून (चेन्नई सुपर किंग्ज) खेळणारा राजवर्धन एमपीएलमध्ये धनंजय मुंडेंच्या सीएसकेकडून (छत्रपती संभाजी किंग्ज) खेळणार आहे.

Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

असा आहे सीएसके (छत्रपती संभाजी किंग्स) संघ

फ्रेंचायजी कंपनीचे नाव – व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (VISPL)

१) राजवर्धन हंगेकर – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर फिनिशनर – सीएसके इंडिया / अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप २०१९ – धाराशिव
२) रामेश्वर दौंड – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर – महाराष्ट्र अंडर १९/२३ – जालना<br>३) आकाश जाधव – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ऑल राऊंडर – महाराष्ट्र अंडर १९/२३ – जालना
४) मोहसीन सय्यद – लेफ्ट हॅन्ड फास्ट बॉलर – महाराष्ट्र अंडर २५ – धाराशिव
५) जगदीश झोडगे – लेफ्ट आर्म स्पिन /लेफ्ट हॅन्ड बॅट – ऑल राउंडर – रणजी / सय्यद मुश्ताक अली चषक – जळगाव<br>६) हितेश वाळूज – लेफ्ट आर्म स्पिन / राईट हँड बॅट – ऑल राउंडर – रणजी / सय्यद मुश्ताक अली चषक – पुणे
७) ऋषिकेश नायर – लेफ्ट आर्म स्पिन /लेफ्ट हॅन्ड बॅट – ऑल राउंडर – संभाजीनगर
८) स्वराज चव्हाण – लेग स्पिनर – नांदेड
९) ओम भोसले – लेफ्ट हॅन्ड बॅट्समन – वन डाउन – महाराष्ट्र अंडर २५ / इंडिया अंडर १० – पुणे
१०) सामसुजमा काजी – राईट ऑफ स्पिन राईट हँड बॅट – फिनिशर ऑल राऊंडर – रणजी / सय्यद मुश्ताक अली – नांदेड
११) आनंद ठेंगे – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर / फिनिशर – महाराष्ट्र अंडर ट्वेंटी २५ – संभाजीनगर
१२) मुर्तुझा ट्रंकवाला – राईट हॅन्ड बॅट्समन – ओपनिंग बॅट्समन – रणजी / मुश्ताक अली चषक – नाशिक
१३) रंजीत निकम – राईट हॅन्ड बॅट्समन – मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर २५ कर्णधार – कोल्हापूर<br>१४) अनिकेत नलवडे – राईट हॅन्ड बॅट्समन – मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर २५ – कोल्हापूर
१५) स्वप्निल चव्हाण – राईट हॅन्ड बॅट्समन – संभाजीनगर
१६) हर्षल काटे – राईट हॅन्ड बॅट्समन – महाराष्ट्र अंडर २५ – पुणे
१७) ओमकार खतापे – राईट हॅन्ड बॅट्समन – ओपनिंग बॅट्समन – हायस्ट रण गेटर एन इन्विटेशन मॅचेस – पुणे
१८) ऋषिकेश दौंड – राईट हॅन्ड बॅट्समन – मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर १९ – धाराशिव
१९) आश्विन भापकर – राईट आर्म मीडियम फास्ट – मिडल ओव्हर बॉलर – पुणे
२०) तनेश जैन – लेफ्ट आर्म स्पिनर – ऑल राउंडर – महाराष्ट्र अंडर २५ – जळगाव
२१) वरून गुजर – राईट हॅन्ड बॅट्समन/ विकेट किपर – मिडल ऑर्डर बॅट्समन – सातारा
२२) सौरभ नवले – राईट हॅन्ड बॅट्समन/ विकेट किपर – ओपनिंग बॅट्समन – रणजी/ सय्यद मुश्ताक अली चषक – बीड
२३) अभिषेक पवार – राईट हॅन्ड बॅट्समन / विकेट किपर – मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर २५ – धाराशिव

राखीव खेळाडू

निशांत नगरकर
कुणाल कोठावळे
अभिषेक ताटे