पुणे : लोकसभा निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत मित्र पक्ष म्हणून सहभागी झालेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला (आरपीआय) पुरेशा जागा दिल्या नाहीत. तरीदेखील आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही निवडणुकांत महायुतीचे काम निष्ठेने केले. निवडणुकीपूर्वी आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांनी हा शब्द पाळावा, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, ‘राज्याच्या सत्तेत वाटा देण्याचा शब्द महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने दिला होता. आरपीआयला मंत्रिमंडळात एक जागा द्यावी. यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्येदेखील आरपीआयने महायुतीला खंबीरपणे पाठिंबा दिला. अडीच वर्षांच्या सत्तेत महायुतीने आरपीआयला एकही महामंडळ दिले नाही. आता मंत्रिमंडळात आरपीआयला स्थान द्यावे.’

Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!

हे ही वाचा… पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का, पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर

ग्रामपंचायत, नगरपालिका, तसेच महापालिकांच्या निवडणुकीत आरपीआय महायुतीबरोबर राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला अधिक जागा सोडाव्यात, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. महायुतीत सहभागी असलेल्या आरपीआयला पुणे महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने उपमहापौरपद दिले होते. यावेळी पुणे शहराचा महापौर हा आरपीआयचा करावा. महापालिकेच्या मागील निवडणुकीत महायुतीत आरपीआयला १२ जागा मिळाल्या होत्या. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत २० जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असून महापालिकेमध्ये आरपीआयचा महापौर होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा… नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा, शनिवार पेठ पोलीस चौकीत तरुणाचा गोंधळ

‘लोकसभा, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआयला ठरावीक जागा द्याव्यात, अशी आमची मागणी होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विधानसभेच्या निवडणुकीत दोन जागा आरपीआयला दिल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या जागांवर लढलेले उमेदवार कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर लढले. ते काही आरपीआयचे उमेदवार नव्हते. राज्यात महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्याची दखल घेत मंत्रिमंडळात स्थान द्यावे,’ असे आठवले म्हणाले.

Story img Loader