scorecardresearch

गाडा सोडून शर्यतींच्या बैलांचे ‘रॅम्प वॉक’

बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी मिळाल्याचा आनंद गाडाप्रेमी शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळू शकला नाही.

मावळातील बैलांच्या रॅम्प वॉकमधील विजेत्या बैलगाडा चालकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

करोनाच्या बंधनातही शर्यतींना पर्याय

पिंपरी: बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी मिळाल्याचा आनंद गाडाप्रेमी शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळू शकला नाही. करोनाच्या  वाढत्या संसर्गाचे कारण देऊन राज्य शासनाने बैलांच्या शर्यतींवर पुन्हा बंदी घातली, तेव्हा बैलगाडा चालक-मालकांचा हिरमोड झाला. शर्यती होत नाही म्हणून आपली हौस भागवण्याबरोबरच बैलांवरील प्रेम दाखवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यावरही तोडगा काढला. मावळात र्शयतीच्या बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आल्या. कान्हे फाटय़ाजवळ जांभूळ वडगाव येथे हा कार्यक्रम झाला. बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांना रंगवून, सजवून त्यांच्या ऐटबाज चालीचे चित्रीकरण करून आयोजकांना पाठवयाचे होते. त्यातील निवडक बैलांचे प्रत्यक्षात पुन्हा सादरीकरण घेण्यात आले. जांभुळ-सांगवीचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धेत दिनेश सातकर यांच्या रूस्तमने पहिला क्रमांक पटकावला.

आम्ही शेतकरी स्वत:च्या लहान मुलांइतकाच जीव बैलांवरही लावतो. शर्यतीत सहभागी होण्यापूर्वी आम्ही स्पर्धक बैलांना उत्तम प्रकारे सजवले होते. अशा स्पर्धा घेतल्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभार मानतो.

– दिनेश सातकर, बैलगाडा शर्यतप्रेमी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ramp walk bulls leaving cart ysh

ताज्या बातम्या