पुणे : महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने पाच युवा कलाकारांना रविवारी (३ जुलै) प्रसिद्ध संगीतकार-गायक डॅा. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते रंगसेतू अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गतवर्षीच्या अभ्यासवृत्ती विजेत्यांचे सादरीकरण होणार आहे.  यंदाच्या अभ्यासवृत्तीसाठी महेश खंदारे (नाट्य), नितीश पुरोहित (संगीत), अमीरा पाटणकर (नृत्य), योगेश रामकृष्ण आणि चारुदत्त पांडे (दृश्यकला) यांची निवड झाली आहे. एका वर्षासाठी दरमहा १२ हजार रुपये असे या अभ्यासवृत्तीचे स्वरूप आहे. या वर्षीपासून ‘झपूर्झा’चे संचालक अजित गाडगीळ हे दृश्यकलेतील एका कलाकाराला पुरस्कृत करणार असल्याने या विभागामध्ये दोन कलाकारांना ही अभ्यासवृत्ती दिली जात आहे. संध्या धर्म, डॉ. अजय जोशी, डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. नितीन हडप या तज्ज्ञांचा निवड प्रक्रियेमध्ये सहभाग होता. प्रमोद काळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangsetu scholarship to five young artists pune print news zws
First published on: 30-06-2022 at 18:07 IST