पुणे: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा ससून रुग्णालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न|rape accused attempted suicide in sassoon hospital crime vanvadi police pune | Loksatta

पुणे: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा ससून रुग्णालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न

वानवडी पोलिसांनी आरोपी अमोल राजू क्षीरसागर याला बलात्काराच्या घटनेमध्ये अटक केली होती. त्या आरोपीला हडपसर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

rape accused attempted suicide in sassoon hospital crime vanvadi police pune
प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील २५ वर्षीय बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आरोपीने बाथरूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.अमोल राजू क्षीरसागर (वय २५, रा.कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा: मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे पोलिसांकडून बँडद्वारे मानवंदना

हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांनी आरोपी अमोल राजू क्षीरसागर याला बलात्काराच्या घटनेमध्ये अटक केली होती. त्या आरोपीला हडपसर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी लॉकअपमध्ये आरोपीने गजावर आणि भिंतीवर डोके आपटले. त्यामध्ये तो जखमी झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने वॉशरूमला जात असल्याचे सांगून आतमध्ये खिडकीतील काच काढून गळ्यावर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 13:32 IST
Next Story
VIDEO: अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती