धक्कादायक: पुण्यात नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार!

आई-वडिलांना दिली होती जीवे मारण्याची धमकी; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

आयटी हब असणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी समीर भालेराव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तो अद्याप फरार आहे. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. आरोपी समीरने फिर्यादीला प्रपोज केले होते. परंतु, तरुणीने नकार दिल्याने त्याच्या रागातून त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर भालेरावने फिर्यादी तरुणी हे एकमेकांना ओळखतात. समीर हा रॅपर गायक असून त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचे काम मिळवून दिले होते. फिर्यादीला देखील मॉडेलिंगची आवड असल्याने दोघांची ओळख झाली. समीरने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला. तो फिर्यादीला मेसेज करत असे. काही दिवसांनी त्याने पीडित तरुणीला एकतर्फी प्रेमातून प्रपोज केले. मात्र, त्यास तरुणीने नकार दिला. यामुळे समीर दुखावला गेला होता. त्याने २५ सप्टेंबर २०२० रोजी तरुणीच्या घरी जाऊन तू माझ्यासोबत चल असे म्हटले होते. तेव्हा देखील तरुणीने नकार दिला होता. घरात पीडित तरुणी आणि ११ वर्षीय भाऊ होता, आई धुनी भांडी करत असल्याने व वडील रिक्षा व्यवसाय करत असल्याने बाहेरच होते. याचा फायदा घेऊन त्याने लहान भावाच्या हाताला धरून घराबाहेर जात तुझ्या भावाचे काय होईल याचा विचारही करू नकोस अशी धमकी दिल्याने पीडित तरुणी भावासह कारमध्ये बसली. तरुणीला पुण्याजवळील राहत्या घरी आणले. याची माहिती तरुणीच्या आई वडिलांना दिली आणि दोघेही संबंधित ठिकाणे तातडीने आले. आरोपी समीरने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अन, लहान भावाला घेऊन जा असे म्हटले शिवाय तुमच्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक्षात मात्र तस झालं नाही. समीरची आई आणि तोच घरात राहात होते. त्याने आईला पीडित तरुणीची ओळख पत्नी म्हणून करून दिलेली होती. आरोपीची आई शक्यतो घराबाहेर जास्त असायची.

आई बाहेर जाताच तो पीडित तरुणीवर अत्याचार करायचा. तर बाहेर जाताना घराला कुलूप लावून जायचा. पीडित १८ वर्षीय तरुणीवर आरोपी समीर हा वारंवार बलात्कार करत असल्याने ती भयभीत झाली होती. तसेच तरुणीला झोपेत असताना नशा करण्याचे इंजेक्शन देत असे असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार १७ जुलै २०२१ पर्यंत सुरू होता. दरम्यान एकेदिवशी समीर फोनवर बोलत असताना तरुणीने घरातून पोबारा केला. तिने वडिलांचे घर गाठले. परंतु, काही वेळाने तरुणीच्या घरी समीर आला अन बेदम मारहाण करत पुन्हा राहत्या घरी घेऊन गेला. परत, काही दिवसांनी ती पळून जाण्याचा यशस्वी झाली. पीडित तरुणी आई-वडिलांकडे आली अन ते सर्वजण चुलत भावाकडे गेले. दरम्यान, आरोपीने बलात्काराचे अर्धनग्न व्हिडिओ फोटो इन्स्टाग्रामवरवरून पीडित तरुणीला पाठवत धमकावले. तसेच, तिच्या वडिलांच्या व्हॉटसऍप मोबाईलवर पाठवले. यामुळे पीडित तरुणीच्या कुटुंबाला काय करावे हे कळत नव्हते. अखेर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार द्यायची असे ठरवले. त्यानुसार हिंजवडी पोलिसात तकारार देण्यात आली असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर या करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rape of a young woman in pune by injection of drugs an act of one sided love msr 87 kjp