विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी गर्भवती झाल्यानंतर ती अनुसूचित जातीतील असल्याचे सांगून आरोपीने विवाहास नकार दिला. तसेच छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी बलात्कार, माहिती-तंत्रज्ञान कायदा; तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> यंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद

मिलिंद बाळासाहेब भोईटे (वय ३३, रा. पवारवाडी, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्यासह रविना कांबळे नावाच्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी भोईटेने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाल्यानंतर भोईटेने तिला धमकावून गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास सांगितले. तरुणीचा गर्भपात घडवून आणला.
भोईटेने तरुणीची छायाचित्रे काढली होती. त्याने छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. छायाचित्रे रविना कांबळे नावाच्या महिलेला पाठविली. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा अनुसूचित जातीतील असल्याचे सांगून भोईटेने विवाहास नकार दिला. तिला धमकावले, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित गुन्हा बाणेर भागात घडल्याने तपासासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape of a young woman with the lure of marriage pune print news amy
First published on: 05-10-2022 at 17:02 IST