पुणे : मैत्रिणीच्या पतीकडून तरूणीवर बलात्कार, समाजमाध्यमावर ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी

मैत्रिणीच्या पतीने तरूणीला धमकावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.

पुणे : मैत्रिणीच्या पतीने तरूणीला धमकावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. समाजमाध्यमावर ध्वनीचित्रफित तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मैत्रिणीच्या पतीने तरुणीकडून पैसे उकळले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय २२) आणि आशिष विजय कांबळे (वय २३, दोघे रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सिद्धार्थ पीडित तरुणीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने समाजमाध्यमावरून तरुणीला संदेश पाठविला होता. तू मला खूप आवडतेस, असे त्याने संदेशात म्हटले होते.

यानंतर सिद्धार्थ तरुणीला मोटारीत घेऊन फिरायला गेला. तिला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने तरुणीचे मोबाईलवर छायाचित्र काढले. तसेच ध्वनीचित्रफित तयार केली. ध्वनीचित्रफित, छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीकडून १७ हजार रुपये घेतले.

हेही वाचा : पुणे : प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण, समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी

सिद्धार्थचा मित्र आशिष यानेही तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. आशिषनेही पीडितेवर बलात्कार केला. त्याने तरुणीला मारहाण करुन पैशांची मागणी केली. दोघांच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape of girl by friends husband police arrest accused in pune print news pbs

Next Story
पुणे : नऱ्हे परिसरात सीएनजी पंपावर टोळक्याची दहशत, पंपावरील कामगाराला बेदम मारहाण, सहा जण अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी