पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार
( प्रतिनिधिक छायाचित्र )

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी तरुण सुनील रॉय (रा. आर्च स्मिथ सोसायटी, धानोरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राॅय याची पीडीत महिलेची ओळख झाली होती.

त्यानंतर रॉयने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. राॅयचा विवाह झाला होता. त्याने ही बाब महिलेपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर रॉयने महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. विवाहाबाबत महिलेने विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला.रॉयचा विवाह झाल्याचे समजल्यानंतर पीडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

तरुणीला धमकावून बलात्कार

तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी शुभम सुधीर शेळके (वय २६, रा. कमेला, कोंढवा खुर्द) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम आणि तरुणी ओळखीचे आहेत. त्याने तरुणीला आमिष दाखवून बलात्कार केला. विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape woman lure marriage bundgarden police file charges pune print news amy

Next Story
पुणे :दहावीचा पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के
फोटो गॅलरी