पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी झाले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांनी जवळपास ५० दिवसाहून अधिक काळ शहराच्या अनेक भागात जाऊन प्रचार सभा, रॅली, पदयात्रा काढत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक उमेदवारांला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यास मिळाले.

या निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी,शिरा खात दोघांनी निवडणुकीमधील आलेले अनुभव खेळीमेळीच्या वातावरणात सांगितले. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हे काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाही.

uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Sharad pawar on Ajit Pawar baramati
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”
PM Modi Sabha
PM Modi Roadshow in Mumbai : “काँग्रेसने फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण केलं”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न

आणखी वाचा-अपघाती मृत्यू प्रकरणात तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी ४० लाखांची नुकसान भरपाई

यावेळी रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी आजवर दहा निवडणुका लढलो. त्या निवडणुकामध्ये काही वेळा विजय, तर काही वेळा पराभव पाहण्यास मिळाला. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काही तरी शिकायला मिळाले. तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो. पण या निवडणुकीत माझ्या कुटुंबावर टीका करण्यात आली. त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि त्रास सहन देखील केला. यामुळे माझं कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण मी याचं उत्तर येत्या काळात निश्चित देईल. तसेच या सर्व प्रकारामुळे माझ वैयक्तिक आणि आर्थिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माझे कितीही नुकसान होऊ द्या, मी काही घाबरत नाही. मी काहीच घेऊन आलो नव्हतो आणि काही घेऊन जाणार नाही. मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर दिल जाईल असे सांगत भाजप नेत्यांना त्यांनी सुनावले.

तसेच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक वरीष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या सभेवेळी उपस्थित जनसमुदाय पाहून राहुल गांधी म्हणाले की, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू, त्यामुळे निश्चित मी निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.