कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगरातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९४० मतांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांचीदेखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.

DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

हेही वाचा – पीएमपीच्या ठेकेदारांचा अचानक संप पुणे, पिंपरीतील प्रवाशांचे हाल

हेही वाचा – ‘वंचित’मुळे ‘मविआ’चा उमेदवार पडल्याचा आरोप चुकीचा, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

आज सकाळी शिवाजीनगर येथील मोदी बाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची धंगेकर यांनी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.