भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे. पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत अश्विनी जगताप या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही वेळातच दाखल होतील. “दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. आमचा विजय नक्की होईल”, असा विश्वास दिवंगत आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

शंकर जगताप म्हणाले की, दरवेळेस उमेदवारी अर्ज भरत असताना उत्साह असायचा, तो भाऊंच्या जाण्याने कमी झाला आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही पोटनिवडणुकीला सामोरे जात आहोत. आज वाहिनींचा अर्ज भरायला निघालो असलो, तरी त्या दुःखातून आम्ही सावरलो नाहीत. ते दुःख उराशी बाळगून निवडून येण्यासाठी सज्ज आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

हेही वाचा – जीवघेण्या कर्करोगांची संख्या आजही अधिकच, उशिरा निदान गंभीर, तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

हेही वाचा – होय आम्ही लढतोय, उद्या फॉर्म भरतोय; कसबा निवडणुकीवर हिंदू महासंघाची भूमिका

तर, दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या कन्या ऐश्वर्या म्हणाल्या की, दुःखातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. गेली तीस वर्षे आईने पडद्यामागे राहून वडिलांना पाठिंबा दिला. यामुळे आमचा विजय नक्की होईल, असे वाटते. वडिलांनी ज्या प्रकारे जनतेवर प्रेम केले, तसेच प्रेम आमच्यावर करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.