पुणे : रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’; पुण्यात कोरेगाव पार्क परिसर सर्वांत महागडा, प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम

करोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती.

ready reckoner rates in maharashtra
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

करोना संकटातून सावरून आर्थिक गाडी रूळावर आल्याने आणि पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन वार्षिक मूल्यदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा असणार आहे. त्या खालोखाल प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम राहिले आहे.

हेही वाचा >>> पुणे: अल्पवयीन मुलीला धमकावून बलात्कार करणारा अटकेत

करोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षी (२०२२-२३) राज्यात रेडीरेकनर दरात घसघशीत वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला होता. आगामी  निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही रेडी रेकनरमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे गेल्यावर्षीचेच दर आगामी वर्षभरासाठी लागू होणार असल्याने उच्चभू लोकवस्ती असलेला कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा असणार आहे. त्या खालोखाल प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम आहे. त्यानंतर भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वेरोड फर्ग्युसन रोड हेदेखील महागड्या परिरसराच्या रांगेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:13 IST
Next Story
RSS, भाजपाची विचारसरणी महिलांच्या विरोधात, म्हणूनच महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोललं जातं- प्रणिती शिंदे
Exit mobile version