पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. भाजपचे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि नगर सेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभेत शड्डू ठोकत उमेदवारी मिळविण्यासाठी दावा केला आहे. ते कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असून बंडखोरीच्या तयारीत आहेत. कोथरूड विधानसभेचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील असून त्या विधानसभेवर बालवडकर यांनी दावा केल्याने भाजपमध्ये कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा-…तर मुख्यमंत्र्यांची गाडी अडविणार! काँग्रेसकडून १५ दिवसांची मुदत देत थेट इशारा

अमोल बालवडकर यांनी बालेवाडीत मोठे शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेवर दावा केला आहे. सध्या कोथरूड विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तरीदेखील अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभेवर दावा केला असून भाजप श्रेष्ठी मलाच विधानसभेसाठी उमेदवारी देईल असा विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्ष हा मेरीटच्या आधारावर उमेदवार निवडण्यात येईल असं विधान अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलं आहे. मी भाजपमधून इच्छुक असून भाजप माझा नक्की विचार करेल असं देखील अमोल बालवडकर म्हणाले आहेत. भाजपने माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असे म्हणत बालवडकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. बालवडकर हे माजी नगरसेवक असून शहर सुधार समितीचे अध्यक्ष आहेत. भाजप मध्येच कोथरूड विधानसभेवरून कहलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.