rebellion in Congress for the nomination of kasba by election Pune print news ccp 14 ysh 95 | Loksatta

कसब्याच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बंडखोरीची चर्चा सुरू

कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे.

congress-flag
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पुणे : कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूून कसब्यात उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच बंडखोरीची चर्चा सुरू झाली आहे.

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी महापौर कमल व्यवहारे, नीता परदेशी, गोपाल तिवारी आदी सोळा जणांनी इच्छुक म्हणून नावे नोंदवली होती. तसेच मुलाखतीही दिल्या होत्या. मात्र अद्याप काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नसल्याने कोणाला संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> कसब्याचा काँग्रेसचा उमेदवार रविवारी जाहीर होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली. गेली ४० वर्षे मी काँग्रेसचे काम करत आहे. त्यामुळे मला संधी दिली जावी. बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास मी बंडखोर म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 22:05 IST
Next Story
परदेशी विद्यापीठांना भारतात शिक्षण संकुल सुरू करणे आव्हानात्मक, पद्म पुरस्कारप्राप्त डॉ. दीपक धर यांचे मत