पुणे : एनआयआरएफ क्रमवारीतील स्थान घसरल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३२ प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून, राज्य शासनाकडून प्राध्यापक भरती रखडल्याने प्राध्यापक भरतीचा आर्थिक ताण विद्यापीठाला सहन करावा लागत आहे.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास ५५ टक्के जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्यासह विद्यापीठाच्या क्रमवारीवरही झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ क्रमवारीमध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्थानामध्ये घसरण झाली. त्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागा हा महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे या संदर्भात विद्यापीठाने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती करण्यात येईल. तर विद्यापीठ निधीतून भरण्यात आलेल्या १४० जागांपैकी रिक्त जागांचा आढावा घेऊन त्याही जागा भरल्या जातील. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की शिक्षक विद्यार्थी गुणोत्तरामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक कामकाज सुरू झाल्यावर प्राध्यापक उपलब्ध असतील. तसेच विद्यापीठ निधीतून भरलेल्या १४० प्राध्यापकांपैकी किती जागा रिक्त आहेत, याचा आढावा घेऊन त्याही जागा सप्टेंबरअखेरीपर्यंत भरल्या जातील.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई