पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाने गेल्या दोन वर्षांत शहरातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचे निराकरण करुन त्यांना दिलासा दिला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी नातेवाईकांना त्रास दिला. संपत्ती, पैसे ताब्यात घेऊन वाऱ्यावर सोडून दिले. जवळच्या नातेवाईकांनी सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली, अशा अनेक तक्रारी पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. पोलिसांनी समुपदेशनाबरोबरच वेळप्रसंगी काठीचा धाक दाखविल्याने ज्येष्ठ नागरिकांना न्याय आणि आधार मिळाला आहे.

हेही वाचा >>>पुणे: राज्यात आजपासून थंडी वाढण्याची शक्यता

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात तसेच परराज्यात स्थायिक झाली आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांची मुले वेगळी राहत आहेत. उतारवयात जवळच्या नातेवाईकांकडून ज्येष्ठांना संपत्ती, पैशांसाठी त्रास दिला जातो. माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे गेल्या दोन वर्षांत दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जापैंकी एक हजार पाच तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: ‘एनआरडीसी’च्या लोकसंपर्क केंद्राची पुण्यात स्थापना; नवउद्योग, संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न

जेष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी एप्रिल २०१७ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारी दाखल झाल्यानंतर नातेवाईकांना बोलावून पोलिसांनी मध्यस्थी करून तक्रारींचे निराकरण करण्यास प्राधान्य दिले. विवाहित मुले-मुलींसह जवळच्या नातेतवाईकांकडून त्रास दिला जातो. मालमत्तेचा वाद, आर्थिक वादातून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे करण्यात आल्या होत्या. या कक्षाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. प्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखविण्यात आला. २०२० मध्ये ज्येष्ठ नागरिकाकडे ९५ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. २०२१ मध्ये ४०० ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. २०२२ मध्ये ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे आतापर्यंत ५८९ तक्रार अर्ज दाखल झाले. त्या पैकी ५१५ तक्रारी सोडविण्या आल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे: नाताळ, नववर्ष स्वागतानिमित्त पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ९० टक्के आरक्षित

जवळच्या नातेवाईकांनी संपत्ती, दागिने लुबाडले. नातेवाईकांनी त्रास दिला, अशा तक्रारी ज्येष्ठांकडून करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर नातेवाईकांना पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात बोलावून घेण्यात आले. त्यांना समजावून सांगण्यात आले. प्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखविण्यात आला. मध्यस्थीचा मार्ग निवडून तक्रारींचे निराकरण करण्यात आले.- योगिता बोडखे, सहायक पोलीस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष

ज्येष्ठांकडून दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढते आहे. ज्येष्ठांना दिलासा देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. नातेवाईकांना समज देण्यात आली. ज्येष्ठांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा