मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात फ्लॉवर, मटार, घेवड्याच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (७ ऑगस्ट) राज्य तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाडमधून २५० गोणी मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ३० ते २५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, कोबी ३ ते ४ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, कांदा ५० ते ६० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

कोथिंबीर, कांदापात, पालक, चाकवतच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली असून कोथिंबीर, कांदापात, पालक, पुदीना, चाकवत, राजगिऱ्याच्या दरात घट झाली आहे. मेथी, शेपू, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर आहेत. रविवारी घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे १० रुपयांनी घट झाली आहे. कांदापात, चाकवत, पुुदीना, पालकाच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली आहे. करडईच्या जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली आहे.

डाळिंब, लिंबू, कलिंगड, पपईच्या दरात वाढ

श्रावण महिन्यातील उपवासासाठी फळांना मागणी वाढली आहे. डाळिंब, लिंबू, कलिंगड, पपईच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोसंबी, चिकू, मोसंबीची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अननस, संत्री, खरबूज, सीताफळ, सफरचंदाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात लिंबे एक ते दीड हजार गोणी, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू ३०० खोकी, सफरचंद ७ ते ८ हजार खोकी, सीताफळ ८ ते १० टन, संत्री २ टन, मोसंबी ४ ट्रक, पेरु ७०० ते ८०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

श्रावणात फुलांना मागणी

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुलांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. झेंडुच्या दरात घट झाली असून चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.