पुणे शहरासह जिल्ह्यात नवमतदार नोंदणीसाठी २५ नोव्हेंबरला ४४२ महाविद्यालयात एकाचवेळी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या खास शिबिरात तब्बल ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे पाच रूग्ण; खबरदारी बाळगण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या पात्र दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार ९५० एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात १७ वर्षांवरील भावी मतदारांची आणि १८ वर्षांवरील पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ४४२ महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शिबिरात तब्बल ३१ हजार ६४७ युवक-युवतींची नमूना क्रमांक सहा हा अर्ज भरून मतदार म्हणून नोंद करण्यात आली.

हेही वाचा- तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही

दरम्यान, अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबरला जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये खास शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र नवमतदारांना महाविद्यालयातील खास शिबिरात नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन नव मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration of 31 thousand new voters in one day in pune print news dpj
First published on: 01-12-2022 at 21:16 IST