झोपडीधारकांचे पुनर्वसन एसआरए प्रकल्पांतर्गत

आंबिल ओढय़ालगतच्या दांडेकर पूल परिसरातील भूखंड क्र. २८ येथील घरे पाडण्याची कारवाई गेल्या आठवडय़ात महापालिके कडून करण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे राजेंद्र निंबाळकर यांची माहिती

पुणे : आंबिल ओढय़ालगतच्या पात्र झोपडीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती झोपुप्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. तसेच पुनर्वसन होईपर्यंत बाधितांची पर्यायी निवासाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आंबिल ओढय़ालगतच्या दांडेकर पूल परिसरातील भूखंड क्र. २८ येथील घरे पाडण्याची कारवाई गेल्या आठवडय़ात महापालिके कडून करण्यात आली. स्थानिक नागरिकांचा विरोध, राज्य शासनाचा आदेश आणि महापालिके च्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही कारवाई थांबवण्यात आली आहे.

राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ‘आंबिल ओढा झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यानंतरच कारवाई सुरू के ली होती. कारवाई महापालिका प्रशासनाकडून होत असली, तरी संबंधितांच्या पुनर्वसनाचे नियोजन एसआरएने के ले आहे. या ठिकाणी १३४ घरे आहेत. या सर्वाचे पुनर्वसन ट्रान्झिट कॅ म्पमध्ये करण्याची तयारी झालेली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून १३४ पैकी ९२ कु टुंबांनी यापूर्वीच स्थलांतर के ले आहे. विशेष बाब म्हणून येथे पात्रता निकष न लावता सर्वाना ट्रान्झिट कॅ म्पमध्ये नेले जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणीच ७०० घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी या वस्तीतील ९० टक्के  कुटुंब पात्र असून संबंधितांना पुन्हा येथेच घरे मिळतील.’

दरम्यान, गेल्या आठवडय़ात कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी ३८ कुटुंब अद्यापही वास्तव्याला आहेत. या परिसरातील ६०० कुटुंबांसाठी झोपुप्रा पुनर्वसन प्रकल्प राबवला जात असून त्यामध्ये पात्र बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आदेश विकासकाला दिले आहेत, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rehabilitation of slum dwellers under sra project ssh