scorecardresearch

शहिदांचे कुटुंबीय घुमान साहित्य संमेलनास जाणार

शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनास उपस्थित राहणार आहेत.

शहिदांचे कुटुंबीय घुमान साहित्य संमेलनास जाणार

भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगामध्ये हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
भगतसिंग यांचे पुतणे कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून, तर राजगुरू यांचा पुतण्या सत्यशील राजगुरू आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्याहून संमेलनासाठी येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली.
देसडला म्हणाले, या वीरांचे  स्वातंत्र्यलढय़ातील योगदान बहुमूल्य आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबियांना आमंत्रित केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2015 at 03:15 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या