पुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागात मासिक एकवट मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश नगर विकास विभागाकडून काढण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला आणि बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत महापालिकेतील विविध व्यवसाय गट, मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्त्वावर कर्मचारी काम करत आहेत.

या पदांची समाज विकास विभागाला आश्यकता असल्याने महापालिकेने या पदांची निर्मिती करणे आणि त्या पदांवर सेवकांना सामावून घेण्यास मान्यता दिली होती. महापालिका प्रशानसाने १८७ पदांची निर्मिती करून त्यावर १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता द्यावी, यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात, किमान वेतन आणि मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले आहे.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

हेही वाचा >>> बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरुस्तीला मुहूर्त; नाट्यकर्मींच्या टिकेनंतर महापालिकेला जाग

त्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रा. मेधा कुलकर्णी यांनी त्यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील निवेदन दिले. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून कुलकर्णी यांना देण्यात आले. नवी मुंबई महानगरपािलका, (समाजविकास विभाग), संभाजीनगर मनपा(समूहसंघटिका पद), परभणी मनपा स्थापत्य विभाग पिंपरी-चिंचवड मनपा (आरसीएच), नांदेड मनपा (उपअभियंता स्थापत्य),कल्याण डोंबिवली मनपा (वाहनचालक), मीरा भाईदर मनपा (विधी विभाग), लातूर मनपा (एएनएम) याठिकाणी एकवट मानधनावर असलेल्या सेवकांना मनपा सेवेत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. पुणे मनपा मध्येदेखील आरोग्य विभागाकडील ७५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले होते. त्यानंतर समाजविकास विभागातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले आहे.