पुणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) निवास्थाने पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली आहेत. पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी आहे. त्यामुळे केवळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यासाठी महामंडळाची सर्व निवासस्थाने खुली ठेवण्यात आली आहेत.

करोनामुळे टाळेबंदी, विविध निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना मनमोकळे पर्यटन करता येण्याला पुन्हा एकदा मर्यादा आल्या आहेत. मात्र, पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यास परवानगी आहे. डिसेंबर-जानेवारी हे दोन महिने प्रामुख्याने सहलीचे असल्याने अनेक पर्यटकांनी  तारकर्ली, भिमाशंकर, महाबळेश्वर, सिंहगड, म्हाळशेज अशा थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या निवासस्थानातील खोल्यांचे आरक्षण केले आहे. फेब्रुवारी महिन्यातील देखील अनेक पर्यटकांनी आरक्षण केले आहे. शहरासह जिल्ह्यात करोनाचा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातीस सर्व गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने पर्यटनस्थळांवर देखील निर्बंध घालण्यात आल्याने पर्यटकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, महामंडळाची पुण्यातील सर्व निवासस्थाने ५० टक्के उपस्थितीत खुली ठेवण्यात आली आहेत. निवासस्थानांवर करोनाविषयक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी देखील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी होती. या काळातही महामंडळाची निवासस्थाने राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटकांना केवळ निवासासाठी खुली ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे आताही निवासस्थाने पर्यटकांसाठी खुली आहेत.’

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापासून फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांनी महामंडळाच्या निवासस्थानांमधील खोल्यांचे आरक्षण अगोदरच केले आहे. मात्र, पर्यटन स्थळांवर निर्बंध घालण्यात आल्याने आतापर्यंत पाच टक्क्यांहून अधिक पर्यटकांनी आरक्षण रद्द केले आहे. मात्र, केवळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यासाठी महामंडळाची सर्व निवासस्थाने खुली ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आरक्षण रद्द करू नये, असे आवाहनही हरणे यांनी केले आहे.

करोनाविषयक सर्व नियमांचे पालन

महामंडळाच्या निवासस्थांमधील खोल्यांमध्ये जंतूनाशक (सॅनिटायझर), शरीर तापमान आणि प्राणवायू मोजण्याची सुविधा, प्राथमिक उपचारांची सोय करण्यात आली आहे. करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी करोना काळातही महामंडळाच्या निवासस्थानांना राहण्यासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे पर्यटकांनी निसर्ग अनुभवण्यासाठी महामंडळाच्या निवासस्थानांना भेट द्यावी, असेही हरणे यांनी सांगितले.