पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in   या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहून त्याची प्रत घेता येईल.

 निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत , पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-ssc.ac.in/ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.