पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १३ जुलै रोजी प्रसृत केले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने हे आदेश मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद आनंद पुन्हा घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत होता. हवामान विभागाने गेल्या आठवड्यात जिल्ह्याला मुसळधार पावसाचा लाल रंगाचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reversal ban forts tourist spots heavy rain warning background pune print news ysh
First published on: 20-07-2022 at 09:29 IST