लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहत भागातून काढण्यात आलेला ‘रुट मार्च’ अडवून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. रिक्षाचालक, त्याची पत्नी आणि आईने पोलिसांशी झटापट केली. पत्नी आणि आईने पोलीस कर्मचाऱ्याचा हाताचा चावा घेतला. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, पर्वती पोलिसांकडून त्याची आई आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
pune case against doctor
पुणे: गोळीबारातील जखमी चंदन चोरट्यांवर उपचार करणारे डॉक्टर गोत्यात, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

याबाबत पोलिस कर्मचारी अविनाश कांबळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक सोमनाथ दास चौधरी (वय ४०, रा. पर्वती) याला अटक केली. त्याची त्याची पत्नी राणी (वय ३२) आणि आई सीताबाई (दोघी रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनता वसाहतीतील शंकर मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

आणखी वाचा-पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात फेरी (रुट मार्च) काढण्यात येत आहे. पर्वती पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी जनता वसाहत भागातून रुट मार्च काढण्यात आला. रुट मार्चमध्ये पर्वती पोलीस ठाण्यातील ७ पोलिस अधिकारी, ४३ पोलिस कर्मचारी आणि सीमा सुरक्षा दलाची (बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स) एक तुकडी, पोलिसांची वाहने सहभागी झाली होती. परतीच्या मार्गावर जनता वसाहत परिसरातील गल्ली क्रमांक १०८ च्या दिशेने रिक्षाचालक चौधरी निघाला होता. पोलीस कर्मचारी खाडे आणि सुर्वे यांनी पोलिसांचे वाहन जाण्यासाठी त्याला रिक्षा रस्त्याच्या कडेला लावण्याची विनंती केली. त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यामध्ये आडवी लावली. रस्ता अडवून त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून सांगितले.

आणखी वाचा-अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालक चौधरीने आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील रहिवासी तेथे जमले. चौधरीला पोलीस कर्मचारी कांबळे यांनी समजावून सांगिले. रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. तेव्हा त्याने कांबळेंना धक्काबुक्की केली. चौधरीची पत्नी आणि आईने पोलिसांना दगड भिरकावून मारला. महिला पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. तेव्हा दोघींनी महिला पोलिसांच्या हाताचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौधरीला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

Story img Loader