पुण्यात सुरु असणाऱ्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांकडून पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी रिक्षा चालकांनी गाणी आणि भजन म्हणत राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचा निषेध त्यांनी नोंदविला. परिणामी शहरात रिक्षा वाहतूक बंद केल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा- पुणे: शहरात आज पुन्हा रिक्षा बंद

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

या आंदोलनात केशव क्षीरसागर म्हणाले की, रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात आम्ही २८ नोव्हेंबर रोजी देखील आंदोलन केले होते. त्यानंतर देखील रॅपिडो कंपनीमार्फत बाइक टॅक्सी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे आम्ही आज आरटीओ कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहोत, जोपर्यंत रॅपिडो कंपनी बाइक टॅक्सी बंद करीत नाही. तोपर्यंत आमच आंदोलन सुरूच राहणार आहे.आमच्या रिक्षा चालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ,अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.