पिंपरी-चिंचवड येथे पीएमपीएल बसच्या धडकेत एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वाकड वाय जंक्शन येथे घडली. विजय वीरपाक्ष स्वामी (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रविराज चव्हाण (वय ३२) या पीएमपीएल चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपास करत आहेत.
विजय स्वामी हा बाणेर येथील इव्ही सॉफ्टवेअर या कंपनीत अभियंता म्हणून कामाला होता. काळेवाडीहून तो पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून ( एमएच २५ एई १०६९) कामाला जात होता. वाकड वाय जंक्शन येथे आला असता चिंचवडकडे जाणारी पीएमपीएल बसची (एमएच १४  सीडब्ल्यू ३०३६) व त्याची समोरासमोर धडक झाली. त्यात विजय हा खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह औंध रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.