पहिल्या टप्प्यात २४० किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईचे प्रस्ताव

पुणे : पावसाळा संपताच शहरातील रस्त्यांची पुढील काही महिने मोठ्या प्रमाणावर खोदाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खासगी मोबाइल कंपन्यांकडून २४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई करण्यात येणार आहे. तसे प्रस्ताव खासगी कं पन्यांकडून महापालिके च्या पथ विभागाला देण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळणार असल्याने पुढील काही महिने खोदलेले रस्त्यांचे चित्र शहरात दिसून येणार आहे. त्याचा वाहतुकीलाही अडथळा  होणार आहे.

खासगी मोबाइल कंपन्यांबरोबरच महावितरण, महाराष्ट्र नैसर्गिक वायू महामंडळ, बीएसएनएल आदी शासकीय संस्था आणि संलग्न कंपन्यांकडून विविध सेवा वाहिन्या टाकण्याची कामे के ली जातात. ही कामे करण्यास ऑक्टोबर महिन्यापासून परवानगी दिली जाते. त्यानुसार परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिके च्या पथ विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पथ विभागाकडे २४० किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सध्या खासगी मोबाइल कं पन्यांकडून मोठ्या प्रमाणावर परवानगी मागण्यात आली आहे. यामध्ये रिलायन्स जीओ कं पनीने १६० किलोमीटर लांबीच्या, तर एअरटेल मोबाइल कं पनीकडून ४० आणि अन्य लहान-मोठ्या कंपन्यांकडून ४० किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईची परवानगी मागण्यात आली आहे. रस्ते खोदाईबाबतच्या प्रस्तावांमध्ये येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात रस्ते खोदाईला मान्यता दिल्यानंतर पावसाळा तोंडावर आल्यानंतरही सेवा वाहिन्या टाकण्याची कामे सुरूच असतात.  याचबरोबर महापालिके च्या पथ विभाग, मलनिस्सारण विभाग, विद्युत विभागाकडूनही कामे होणार आहेत. त्यामुळे पुढील सहा ते सात महिने रस्त्यांची मोठ्या प्रमाणार दुरवस्था होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिके ने कामे सुरू के ली आहेत. याअंतर्गत १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तसेच जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे के ली जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी काही प्रभागात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कामांनीही वेग घेतला आहे.

खासगी कंपन्यांसाठी दरनिश्चिती

खासगी कं पन्यांना सवलत न देता १२ हजार १९२ रुपये प्रति रनिंग मीटर याप्रमाणे शुल्क आकारणी के ली जाते. याव्यतिरिक्त एचडीडी या पद्धतीने रस्ता खोदाई के ल्यास प्रती रनिंग मीटर ४ हजार रुपये एवढे शुल्क आकारले जाते. तसेच रस्ता दुरुस्तीसाठी ६ हजार १६० रुपये प्रति रनिंग मीटर हा दर निश्चित करण्यात आला आहे. सध्या शासकीय यंत्रणांना प्रती रनिंग मीटर २ हजार ३५० या प्रमाणे शुल्क आकारणी होत आहे. खासगी कं पन्यांकडून परवानगी दिलेल्या अंतरापेक्षा जास्त लांबीची खोदाई करण्यात येते, अशा तक्रारी सातत्याने महापालिके कडे स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी के ल्या आहेत. त्यामध्ये तथ्य असल्याचेही पथ विभागाला आढळून आले आहे. त्यामुळे यंदाही रस्त्यांची वारेमाप खोदाई होण्याची शक्यता आहे.