पुणे : पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या महापालिकेच्या मनसुब्यावर येरवड्यातील हाॅटमिक्स प्रकल्प पुन्हा नादुरुस्त झाल्याने पाणी फिरले गेले आहे. हाॅटमिक्स प्रकल्प नादुरुस्त झाल्याने रस्ते दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली असून, पुढील काही दिवस वाहनचालक आणि पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

रस्ते आणि खड्डे दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या डांबरमिश्रीत खडीसाठी (हाॅटमिक्स) येरवडा येथे हाॅटमिक्स प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात आला आहे. शहराचे क्षेत्रफळ २५० चौरस किलोमीटर असताना या प्रकल्पामधून पुरेसे हाॅटमिक्स उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांच्या समावेशामुळे भौगोलिक क्षेत्र ५१९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. त्यामुळे कच्चा माल तयार करण्याचा संपूर्ण भार हा येरवडा येथील हाॅटमिक्स प्रकल्पावर आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची वेळ आल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी प्रकल्प बंद पडत आहे. ऑगस्ट महिन्यात हा प्रकल्प तीन वेळा बंद पडला होता. त्यानंतर प्रकल्पाचे कंट्रोल पॅनेल नादुरुस्त झाल्याने डांबरमिश्रीत खडी उपलब्ध होण्यास मर्यादा आल्या आहेत.

Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

हेही वाचा – पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश

रस्त्यांवरील खड्डे सात दिवसांच्या आता बुजवावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवानंतर दिले होते. ही मुदत शनिवारी (७ ऑक्टोबर) संपणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पथ विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे बुजविण्याला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी डांबरमिश्रीत खडीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प बंद असल्याने ती पूर्ण झालेली नाही. सध्या ७० ते ७५ टन एवढी डांबरमिश्रीत खडी या प्रकल्पातून उपलब्ध होत आहे.

प्रतिदिन ५०० टन डांबरमिश्रीत खडी

या प्रकल्पामधून प्रतिदिन सरासरी ५०० टन डांबरमिश्रीत खडी तयार केली जाते. महापालिकेचा पथ विभाग आणि १५ क्षेत्रीय कार्यालयाला प्रत्येकी १० टन या प्रमाणे १५० टन डांबरमिश्रीत खडी दिली जाते. पावसाने उघडीप दिली असल्याने खड्डे दुरुस्तीला गती येईल, असे वाटत असतानाच खड्डे दुरुस्तीची प्रक्रिया मात्र ठप्प झाली आहे.

हेही वाचा – मंडप न काढणाऱ्या ७० मंडळांना महापालिकेची नोटीस; २३ मंडळांवर कारवाई करून साहित्य जप्त

महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहराची भौगोलिक हद्दही वाढली आहे. समाविष्ट गावातील रस्त्यांची दुरुस्तीही महापालिकेला करावी लागत आहे. येरवडा येथील प्रकल्पावर ताण येत असल्याने काही वर्षांपूर्वी शहराच्या चारही बाजूला हाॅटमिक्स प्रकल्प उभारण्याचे नियोजित होते. स्थायी समितीच्या बैठकीत तसा निर्णयही झाला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

Story img Loader