Premium

पुणे: ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावले

ओळख लपविण्यासाठी चोरट्याने चेहऱ्याला रंग लावल्याचे उघड

robbery
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील ८० हजारांचा सुवर्णहार दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना धनकवडी भागात घडली. पसार झालेल्या चोरट्याने त्याच्या चेहऱ्यावर रंग लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहे.

आणखी वाचा- लोहगाव विमानतळावर महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेणारी प्रवासी तरुणी अटकेत

ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. काही कळायचा आत चोरटा महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Robbed jewellery of 80 thousand rs by thief pune print news rbk 25 mrj

First published on: 13-03-2023 at 10:32 IST
Next Story
लोहगाव विमानतळावर महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेणारी प्रवासी तरुणी अटकेत