पिंपरी : पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम (डिलिव्हरी बॉय) करणाऱ्या तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख ३७ हजार रुपयांचे १२५ ग्रॅम दागिने हस्तगत केले.

श्रीकांत दशरत पांगरे (वय २९, रा. कुंभेजळगाव, गेवराई, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका हौसिंग सोसायटीत १३ जानेवारी रोजी दुपारी घरफोडी झाली होती. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घराचा मागील दरवाजा, लोखंडी कपाटाची कोणत्याही प्रकारची तोडफोड झाली नसल्याचे आणि दरवाजाची आतील कडी बाहेरुन हात घालून उघडणे शक्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

Mehul Choksi
Mehul Choksi : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर झाल्याची शक्यता, वकिलाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ratnagiri crime news
रत्नागिरीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला मंगळवेढा येथून अटक, पिस्तूलासह ५ जिवंत काडतुसे हस्तगत
dhananjay munde karuna sharma Controversy
Karuna Munde: ‘वाल्मिक कराडचा मुलगा कोट्याधीश, पण धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंनी मुलाबाबत का सांगितलं?
CSR Scam
निम्म्या किमतीत मिक्सर, स्कूटर देण्याचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणाने केली २० कोटींची फसवणूक
kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
Mumbai High Court
उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयाकडून राखीव
accident on Bandra Worli Bridge
दोन वर्षांपूर्वीचा वांद्रे-वरळी सेतूवरील विचित्र अपघात; मानिसक आजाराने ग्रस्त कार चालकाला उच्च न्यायालयाकडून जामीन

हेही वाचा >>>लष्करप्रमुखांकडून पुण्याचा गौरव, म्हणाले, ‘लष्करासाठी पुणे ‘पॉवर हाउस’’

चोरी घरातीलच कोणीतरी  केल्याचा पोलिसांना संशय आला. कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली असता फिर्यादी औषधाचे दुकान चालवतात तर पती नोकरीसाठी दिवसा बाहेर असतात हे समजले. फिर्यादीचा सख्खा भाऊ श्रीकांत हा गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे राहण्यास आला. घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम करतो. पोलिसांनी श्रीकांतबाबत माहिती घेतली.  त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून जुगारात हारल्याची माहिती मिळाली. त्यामुळे  श्रीकांतवर संशय बळावला. श्रीकांत मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

जुगारात हारलेली रक्कम ऑनलाइन जुगार खेळून लोकांची उधारी-उसनवारी देण्यासाठी बहीणीच्या घरामध्ये चोरी केल्याची कबुली त्याने दिली. घराचा मागील दरवाजा उघडा ठेवून घरी कोणी नसताना कपाटातील १२५ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले.  संशय येवू नये म्हणून बहिणीसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचेही श्रीकांत याने चौकशीत सांगितले.

Story img Loader